पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राहुल श-हा उपस्थित होते. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र नेत्यांमधील अंतर्गत गतभेदामुळे याचा फटका पक्षाला बसला आहे. यामुळे पुन्हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याकडे खासदार शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार पवार यांनी चांगल्या प्रकारे काम करून माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी केले.
शरद पवार यांना मानणारा मोठा गट जिल्ह्यात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्यात सत्ता मिळविण्यासाठी पक्षाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार काढून घेऊन पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंतराव देशमुख यांना राजकारणाचा मोटा अनुभव आहे. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्यावरोवर काम केले आहे. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना येथे काम केले आ-हे. यामुळे त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे म्हणून खासदार श-रद पवार यांनी वसंतराव देशमुख यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
