शिर्डी – शिर्डी येथील साई मंदिरात फुलं, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंदिरात हार, फुले नेताना बिलाची पावती दाखवावी लागणार आहे.भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुले, हार, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान दरम्यान परिस्थिती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. साई मंदिरातील फुले, हार, प्रसाद बंदी उठवल्यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांना आता पूर्वीप्रमाणे मंदिरात फुले, हार, प्रसाद नेता येत आहे. परंतु फुले, हार, प्रसाद नेताना प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे. बिलाची पावती नसणाऱ्यांसाठी बंदी कायम असणार आहे. साई संस्थान क्रेडिट सोसायटीमार्फत फुले, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खासगी फुले, प्रसाद विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. साईभक्तांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. परंतु त्यासाठीही पावती आवश्यक असणार आहे. खासगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्यामुळे त्यांच्याकडून पावती मिळत नाही.
