पंढरपूर – तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर विठ्ठल-रुक्मिणी मातेचे थेट दर्शन घेण्यासाठी लोकांनी शनिवारी टोकन पद्धतीने बुकिंग केले आहे. त्या लोकांना ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे रविवारी देवाचे दर्शन मिळणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाउन असल्याने टोकन पास मिळत नसल्याचे दिसून आले.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयीचे योग्य व्यवस्थापन यावर काम करणे अत्यावश्यक आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावीक वेळेत दर्शन हॉलमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल, या अनुषंगाने टोकन दर्शन एनएम कगागात आली शनिवार सकाळी १० पासून समितीच्या संकेतस्थळावरून दर्शनाचे बुकिंग सुरू झाले. यामुळे शनिवारी अनेक जण टोकन दर्शन पास बुकिंगसाठी प्रयत्न करत होते. ऑनलाइन सर्व माहिती भरली जात होती. सर्व माहिती सबमिट करण्याच्या वेळेस सर्व्हर डाउन असा मेसेज येत होता. यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत.
१५ मिनिटे अगोदर या
श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर प्रतीक्षा हॉल तयार केले असून, त्याठिकाणी बैठक व्यवस्था, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी १५ मिनिटे अगोदर टोकन घेऊन यायचे आहे. ते दाखविल्यानंतर त्यांना प्रतीक्षा हॉलमध्ये बसविण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
अनेक जण बराच वेळ टोकन दर्शन पास घेण्यासाठी ऑनलाइन प्रयत्न करत होते. मात्र, मंदिर समितीच्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाउन होते. यामुळे दर्शनाचे टोकन त्यांना मिळाले नाही. यामुळे अनेकांनी विठ्ठल मंदिर वेबसाइट टोकन दर्शन बुकिंग करताना बंद, अशा सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
