मंगळवेढा – मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मंगळवेढा ते गुडापूर (ता. जत, जि. सांगली) जनजागृती सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. या राईडचे सकाळी ६ वाजता दामाजी मंदिररापासून प्रस्थान झाले. यावेळी खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, बावची, चिक्कलगी, मारोळी, जाठर, बोबलाद, लकडेवाडी, माडग्याळ या गावांमध्ये रॅली काढून वृक्ष संवर्धन व लागवड संदर्भातील पत्रके वाटून प्रबोधन केले.सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील गावांनी पुढाकार घेऊन लोक सहभागातून आपापल्या गावात झाडे लावावीत, लावलेली झाडे जपावीत, यासाठी प्रबोधन केले.या राईडमध्ये अविनाश जाधव, प्रा. महेश अलिगावे, चंद्रजित शहा, भारत नागणे, प्रफुल्ल सोमदळे, सिद्धेश्वर डोंगरे, प्रमोद महामुनी, विनायक कलुबर्मे, पवन कापसे, रविराज जाधव, रोहन सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदवला. राईडसाठी हुकूम मुलाणी, नितीन पाटील, शिरीष पाटील यांचे सहकार्य मिळाले. यावेळी सचिन इंगळे, हनुमंत ढेंबरे, नानासाहेब मोरे, नामदेव चौगुले, दत्तात्रय साखरे, चारुदत्त पाटील, दामाजी माने, सतीश दत्तू, आदी उपस्थित होते.
