देशातील कोट्यवधी लाकांना येत्या १५ ऑगस्टपासून टोल टॅक्समधून मोठी सवलत मिळणार आहे. सरकार १५ ऑगस्ट २०२५ पासून कार, जीप, व्हॅन यांसारख्या खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास लागू केला जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास आणखी सोपा होणार आहे. हा पास एक वर्षासाठी वैध असणार आहे. केंद्र सरकार टोल धोरणाचा विचार करत असल्याची चर्चा वऱ्याच दिवसांपासून सुरू होती. सरकारच्या या घोषणेमुळे वाहनधारक सुटकेचा निःश्वास सोडणार आहेत.या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकार कार, जीप, व्हॅन यासारख्या खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास जारी करण्याची तवारी करत आहे. ही पास योजना वर्षांसाठी वैध असणार आहे. या पासची किंमत ३ हजार रुपये विशेषतः कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी, गैरव्यावसायिक वाहनांसाठी आहे. हा पास सक्रिय झाल्यानंतर एक वर्ष किंवा २०० ट्रिप (जे आधी पूर्ण होईल) साठी वैध असेल. वापरकर्ते राष्ट्रीय महामार्ग अॅपवरील एका विशेष विभाग आणि एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या अधिकृत पार्टलद्वारे पास सक्रिय आणि रिन्यू करू शकतात.
खाजगी कार, जीप, व्हॅनसाठीच नवा नियम
टोल प्लाझावरील विशेषतः टोल प्लाझाच्या ६० किमी त्रिज्येत राहणाऱ्यांसाठी समस्या कमी करण्याचा या पासचा उद्देश आहे. अनेकदा जवळपास राहणाऱ्या लोकांनाही टोल भरावा लागतो. त्यामुळे आता त्यांना या पासपासून दिलासा मिळणार आहे. सरकारचा फास्टेंगबाबत नवीन नियम फक्त खाजगी कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू असेल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग वगळले
एकीकडे फास्टॅग पासची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. परंतु या योजनेतून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या सेवेतून वगळले आहे. त्यामुळे वाहनधारकांना येथे टोल द्यावाच लागणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या मार्गासाठीही हा नियम लागू करावा, असे म्हटले आहे
