अकलूज – अकलूज येथील सयाजी राजे वॉटर पार्क मध्ये बुधवार, दि. १८ जून रोजी मोठी दुर्घटना घडली. फिरत्या पाळण्याचा आनंद घेत असताना एक पाळणा अचानक तुटून पडल्याने त्यातील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यातील तुषार धुमाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तुषार धुमाळ हे दौंड येथील व्यावसायिक आहेत. सयाजी वॉटर पार्क या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक खेळाची साधने आहेत. त्यापैकी हा फिरता पाळणा होता. वेगाने पाळणा फिरत असताना त्यातील एक पाळणा निघून पडल्याने ही दुर्घटना घडली आ-हे. अकलूज पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
