एअर इंडिया मागचे समस्यांचे ग्रहण संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील आठवड्यात अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर सतत एअर इंडिया विमान सेवेबाबत काही ना काही समस्या पुढे येत आहेत. कधी फ्लाईटचे इमरजेन्सी लँडिंग करण्यात येते, तर कधी विमानाचा मार्ग बदलावा लागतो. कधी विलंबाने उड्डाण होतात तर कधी फ्लाईट रद्द करण्याची वेळ येते. एअर इंडियाच्या या कारभाराचा सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतोच परंतु आता याचा फटका खासदारांनाही बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
