पुणे – टाळ मृदंगाचा नाद. हरी नामाचा जयघोष आणि पावसाची हजेरी अशा भक्तीमय वातावरणात पवित्र इंदायणी व असंख्य वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी रात्री इंद्रायणीकाठी अलंकापुरीतून पंढरपूरकडे विठुमाऊलींचा प्रस्थान ठेवले. प्रस्थान सोहळ्याचा घेण्यासाठी अमृतानुभव वैष्णवांनी जयघोष इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या स-री अंगावर झेलतच वारकरी यांनी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले आणि जलधारांच्या साक्षीनेच सोहळा पार पडला. इंद्रायणी चा सारा परिसर वारकरी आणि भाविकांनी दुमदुमून गेला. देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अँड . राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर उपस्थित होते.
