संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमीत्ताने श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान च्या वतीने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.आषाढी वारीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो वारकरी पालखी सोहळ्यां सोबत दरवर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत जातात. हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून, तो सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि भक्तीचे प्रतीक आहे व सोहळा प्रस्थाना दिवशी मनोभावे दर्शन झाले. दर्शनानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर सहअध्यक्ष ह.भ.प. श्री ग़हीनीनाथ महाराज औसेकर व सदस्य संभाजीराजे शिंदे यांचा सन्मान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ सुरू शांतीनाथ यांच्या व विस्वस्त श्री चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा) यांच्या हस्ते श्री फळ व पुष्प हार घालून करण्यात आला.तयावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विस्वस्त राजेंद्र बाबुराव उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम मुरलीधर पाटील, विश्वस्थ व पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ रामचंद्र देखणे व कर्मचारी उपस्थित होते.
