पंढरपूर – आषाढी यात्रा आवघी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पंढरपुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रभागा नदीत बेळगाव येथील एका तरुण भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव शुभम पावले (२७) राहणार बेळगाव असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले आहे. घटनेनंतर शोध कार्य करून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.या घटनेमुळे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी शुभम पावले हा तरुण शुक्रवारी आपल्या मित्रांसोबत पंढरपुरात आला होता. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान चंद्रभागा नदीत तो पुंडलिक मंदिराशेजारील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला असता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
