पंढरपूर – आषाढी यात्रेच्या अनुषंगाने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गारे व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदशनाखाली पंढरपूर शहरात आषाढी पूर्वतयारी म्हणून महास्वच्छता अभियान रविवार दिनांक २२ जून रोजी सकाळी ७ ते १० या कालावधीत राबवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी इथापे यांनी दिली.महास्वच्छता अभियान रविवारी सक सचिन ाळी ७ ते १० या कालावधीत राबवले जाणार असून त्याकरिता पंढरपूर शहरातील ४२ ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. महास्वच्छता अभियाना करीता नेमून दिलेल्या ठिकाणी पथकांनी सक ाळी ७. ०० ते १०. ०० वेळेत आपले काम पूर्ण करायचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या अभियानाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
