अकलूज -संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने अकलूज पोलिसांनी अकलूज वस स्थानकामध्ये मॉक ड्रिल चे थरा-रक प्रत्याशीक केले दुपारी सव्वा बाराची. अकलूज बस स्थानकावर दोन संशयित इसम उभे होते. लांब केस वाढवलेले. तोंडाला रुमाल बांधलेला. त्यांचा इरादा काही ठीक दिसत नव्हता. त्यांची संशयास्पद हालचाल पाहून कोणीतरी अकलूज पोलिसांना खबर दिली.अचानक अकलूज बस स्थानकावर एका मागोमाग एक पोलिसांच्या गाड्या येऊन दाखल झाल्या. खाड खाड बुटांचे आवाज करत पोलीस गाड्यांतून उतरले. बस स्थानकाचा कब्जा पोलिसांनी घेतला. सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर उभे करण्यात आले. वेगवेगळ्या पोशाखातील पोलीस, त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदूका, श्वान पथक पाहून प्रवाशी घाबरले.अकलूज बस स्थानकात काहीतरी मोठे घडल्याची खबर क्षणात शहरांत पसरली. लोक मोठ्या संख्येने बस स्थानकाकडे धावू लागले. तेवढ्यात पोलिसांनी दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शस्त्रधारी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले. श्वानाने बॉम्ब ठेवलेली बॅग शोधून काढली. बॉम्ब डिफ्युज करणारे पथक लगेच सक्रिय झाले. आणि त्यांनी तो बॉम्ब डिफ्युज केला. आरोपीना घेऊन काही पोलीस निघून गेले. बस स्थानकातील प्रवाशी घाबरून गेले होते. बघ्यांची प्रचंड गर्दी वाढली होती.
आणि तेवढ्यात पोलिसांनी अनाऊसमेंट केली. घाबरून जाऊ नका. आरोपी पकडण्याची, बॉम्ब नष्ट करण्याची ही एक रंगीत तालीम, मॉक ड्रिल, प्रॅक्टिस होती. कोणीही घाबरू नका. असे म्हटल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला.आषाढी वारीच्या अनुषंगाने अकलूज पोलीस थानेच्या वतीने घेण्यात आलेल्या या रंगीत तालमीमध्ये शॉन पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्यु.आर.टी. पथक, आर. सी.सी. पथक, फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स, सुरक्षाशाखा, वाहतुक शाखा, स.पो.नि. विक्रम साळुंखे, स.पो.नि. योगेश लंगुटे, पोसई हणुमंत जरे, महिला पोसई करिश्मा वणवे, अकलूज पोलीस स्टाफ यांच्या सुमारे शंभर पोलिसांनी सहभाग घेतला होता.
