मंगळवेढा -आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल करण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा परिवहन पदाधिकारी व इतर मंडळींच्या सोबत या नव्या बसमधून आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेतला.ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटी महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत असून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने करत आहे. मंगळवेढा आगारास मिळालेल्या या नव्या बसमुळे मंगळवेढेकरांना निश्चितच दिलासा मिळणार असून आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.
यावेळी प्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, येताळा भगत, राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप, औदुंबर वाडदेकर, चंदकांत पडवळे, अजित जगताप, दादा ओमने, सतीश मोहिते, खंडू खंदारे, प्रवीण खवतोडे, बबलु सुतार, डॉ. शरद शिर्के, कैलास कोळी, महादेव जाधव, संतोष मोरे, शिवाजी सरगर, सचिन शिंदे, डी. सी. जाधव, युवराज घुले, नागेश डोंगरे, सुदर्शन यादव, संतोष मोगले, प्रताप सावजी, रमेश जोशी, सोलापूर जिल्हा परिवहन विभागीय नियंत्रक अमोल गोंजारी साहेब, मंगळवेढा आगार प्रमुख संजय भोसले, आनंद मुढे, सिद्धेश्वर कोकरे, गंगाधर काकनकी, क्रांती दत्तू आदी मान्यवर उपस्थित होते.
