सोलापूर- शेतकऱ्यांना सिंचननासाठी वीज पुरवठा करिता डीपी ची आवश्यकता भासते त्यामुळे शेतकऱ्याकडून महावितरण कडे डीपीची मागणी केली जाते. मात्र आता महावितरण कडून मागेल त्याला सोलार पंप ही योजना आणली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना महावितरण पुरवठा होणाऱ्या विजेची गरज भासणार नाही, तसेच वा योजनेमुळे शेतकऱ्यांचे विजेचे बिल देखील शून्यवर येणार आहे. तसेच शासन सोलर पंप साठी शेतकऱ्यांसाठी अनुदान पण देत आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी डीपीची मागणी न करता मागील त्याला सोलार पंप योजनेतून अर्ज करून सोलर पंप घेण्याचे आवाहन महावितरण अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी केले आहे.शासनांनी शेतर्कयांसाठी सोलार ऊर्जाला महत्व व प्राधान्य दिला आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीची मागणी केल्यानंतर आता शेतकंयांना डीपी मिळणार नाही. शेतर्कयांसाठी सोलार कृषी पंप योजना असून शेतर्कयांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल माने यांनी केला आहे.जुन्या डीपीवर अधिक भार असल्याने व वीज वितरणात बिघाड झाल्याने डीपी जळण्याचे प्रमाण अधिक आहे. शिवाय वीज चोरीमध्येही वाढ होत आहे. म्हणून शासनाने नवीन वीज जोडणी देताना डीपीवरून वीजजोडणी बंद केली आहे. शिवाय नवीन डीपी मागणी असेल तर त्या शेतर्कयांना सोलार कृषी पंप योजनेचा लाभघेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून शेतर्कयांना अनुदानही देण्यात येत असून वीज बिलापासून मुक्ती मिळणार आहे. म्हणून अधिकाधिक शेतर्कयांनी सोलार कृषी पंप योजनेमध्ये सहभागी होऊन शासनाच्या अनुदानाचे लाभ घ्यावे, असे सुनिल माने यांनी सांगितले
