पंढरपूर – आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारकऱ्यांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग रहदारीस खुला केला आहे.या सोहळ्यासाठी सुमारे १४ ते १५ लाख भाविक शहरात येतात. विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होवून जीवित हानी होण्याची दाट शक्यता असलेने दि. ०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वा कुमार आशीर्वाद रकरी, भाविक यांच्याकरीता बाह-`र पडण्यासाठी एक री रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी,भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारूती चौक महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात.या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ (क) अन्वये, सदर आदेश पारीत केला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाईस पात्र राहील. असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
