पंढरपूर – विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची भाजपाच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाची माहिती नागरिकांना व्हावी. यासाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे प्रज्ञावंत मेळावा व प्रदर्शनी उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर पंढरपुरातील मेळाव्यात बोलताना रघुनाथ कुलकर्णी व अन्य.भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष रोहित पानकर यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी माऊली हळनवर, बाबासाहेब बडवे, शकुंतला नडगिरे, प्राजक्ता बेनारे, अपर्णा तारखे, बादलसिंग ठाकूर, गजेंद्र पवार, करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम, बालाजी वाघमारे, धीरज म्हमाणे, रंजीत जाधव, संदीप कळसुले, विजय भुसनर, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, प्रसाद कोळेकर यांच्यासह डॉक्टर, वकील, इंजिनीयर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मेळाव्याला मार्गदर्शन करताना भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी भाजपा सरकारने अकरा वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांना उजाळा देत देशातील १४० कोटी जनतेला सोबत घेऊन २०४७ साली भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू होईल असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. हे काम भाजपा कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
