पंढरपूर – उजनी धरणात मिसळत असलेला दौंडचा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला असून शनिवारी सायंकाळी २७हजार ४५६ क्युसेक इतका होता. आषाढी वारी लक्षात घेता पूरनियंत्रण कक्ष उजनीची धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या धरणात ७५.७७ टक्के पाणी आहे.उजनी धरणातून २१ हजार ६०० क्युसेक विसर्ग उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी दौंड येथील पाणीपातळी ६३ हजार क्युसेक होती. उजनी पाणलोट क्षेत्रातील पाऊस घटल्याने दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात घट होत गेली. धरणाची वीर धरणातूनही पाणी सध्या बंडगार्डन येथील विसर्ग १० हजार ३९१ क्युसेक असून, दौंड येथून २७ हजार ४५४, तर नीरा नरसिंहपूर येथील विसर्ग ५ हजार ६६२ क्युसेकपर्यंत असून पंढरपूर येथील पाणीपातळी ७ हजार २८८ क्युसेक आहे. उजनीतून व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने रविवारपासून पंढरपूर येथील पाणीपातळीत वाढ होणार आहे.पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता १६ दरवाजांतून १० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू करण्यात आला होता. त्यात शुक्रवारी सायंकाळी ११ वाजता १५ हजार करण्यात आला. तर शनिवारी दुपारी ३ वाजता ५ हजारांची वाढ करून २० हजार करण्यात आली आहे. तर वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेक सोडण्यात येत आहे.
