अकलूज- संत ज्ञानेश्वर महाराज वतुकाराम महाराज पालखी सोहळा ३० जून व १ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत. या सोहळ्यात १३ हजार वाहने व १० ते ११ लाख भाविकांचा अंदाज आहे. यासा-ठी पर्यायी मार्ग, पार्किंग व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तयारी केली आहे. १८ जून ते १० जुलैदरम्यान पंढरपूर पालखी मार्गावर भाविक, वारकरी, पालख्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी (ता. माळशिरस) प्रवेश होणार आहे. नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरकडे जाईल. यात ७-८ लाख भाविक आणि ९ हजार वाहने सहभागी असतील.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलै रोजी अकलूज येथे प्रवेश करेल. यात ३-४ लाख भाविक आणि ५ हजार वाहने सहभागी होतील.बंदोबस्तासाठी पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, बीडीडीएस महिला पोलिस, ट्रैफिक पथक तैनात केले आहेत. विनापरवाना ड्रोन उडवताना आढळल्यास ड्रोन जॅमर गनचा वापरला जाईल. पालखी मार्गावर वाहतूक बदल, जड वाहनांना बंदी घातली आहे. रिंगण, विसावा व मुक्कामस्थळी बेरिकेडिंग, मदत केंद्र, मिसिंग सेल उभारले आहेत. महिला सुरक्षाः निर्भया पथक व विशेष महिला पोलिस पथके कार्यरत आहेत. चोरी रोखण्यासाठी अँटीथेफ्ट पथक नेमले आहे. पालखी मार्गावर हॉटेल्स, ढाब्यांवर महा व मांस विक्रीस बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी केंद्र उभारले असून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.आषाढी सोहळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २९ जून ते ७ जुलै दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांच्या वापराबाबत आवाहन केले आहे. पंढरपूर-पुणे-वाखरी, साळमुख फाटा-पिलीव-म्हसवड-फलटण किंवा पंढरपूर-टेंभुर्णी-पुणे, पुणे-पंढरपूर मार्ग – फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपूर किंवा पुणे-टेंभुर्णी-पंढरपूर. वेळापूर-पंढरपूर-सांगोला-पुणे मार्ग, साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपूर, वेळापूर-अकलुज-इंदापूर, पुणे-इंदापूर-पंढरपूर/अकलुज-सोलापूर मार्गः टेंभुर्णी-पंढरपूर, टेंभुर्णी-सोलापूर, सोलापूर-अकलूज, टेंभुर्णी-अकलूज हे पर्यायी मार्ग आहेत.
