पंढरपूर – २०२५ अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राहुल १४८ कचरा गोळा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरचा कॉरीडॉर सगळ्यांच्या संमतीनेच करणार असल्याचे जाहीर केले.पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५ चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, माजी आमदार प्रशांत सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच सोलापूर जिल्ह्यासह संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास ८ हजार स्वयंसेवकांनी ही स्वच्छता मोहीम राबवली. पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीमकडे द्यावा. स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.आमदार समाधान आवताडे यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून राबवलेल्या वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. तसेच वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा प्रारंभ
महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्रातील 80 शहरातून 4 हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन होते आहे. या निमित्ताने सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ –
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५ चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.
