चिनी वैज्ञानिकांनी एक मिलिट्री ड्रोन तयार केले आहे. या ड्रोनची साईज आणि आकार एखाद्या मच्छरासारखा आहे. मच्छरच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहे. चिनी वैज्ञानिकांनी त्यांच्या मिलिट्री ऑपर शनसाठी मच्छरच्या आकाराचे एक खूप लहान ड्रोन तयार केले आहे. हे माइको ड्रोन नॅशनल युनिवर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या रोबोटिक्स प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे. हे माइक्रो ड्रोन आकाराने छोटे आणि कॉम्पॅक्ट आहेत. त्याचा वापर मिलिट्री आणि डिफेन्सशिवाय विविध Apps च्या माध्यमातून केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा प्रोटोटाइप संशोधकांकडून सीसीटीव्ही ७ डिस्प्लेवर तयार केला आहे. मच्छराच्या आकाराच्या या ड्रोनमध्ये २ छोटे पंख आहेत, ज्याने ते हवेत उडू शकते.सोबतच या ड्रोनला मच्छरांसारखे ३ पाय देखील आहेत.
हा ड्रोन स्मार्टफोनने कंट्रोल केला जाऊ शकतो. हे जवळपास एक मच्छर म्हणजे १.३ सेंटीमीटर लांब आहे. त्यामुळेच याला Mos-quito Drone असे म्हटले जाते. ‘एनयुडीटी’ चा एक विद्यार्थी लियांग हेक्सियांगने म्हटले की, माझ्या हातात मच्छरासारखा एक खास रोबोट ड्रोन आहे. या प्रकारचे छोटे बायोनिक रोबोट खासकरून गुप्त माहिती आणि युद्धाच्या मैदानात उपयोगी ठरणारे आहेत.
