दोन दिवसांपूर्वी,१४ मे ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला अचानक भेट दिली.या सरप्राईज व्हिजीट मध्ये रूग्णालय प्रशासनाकडून कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णालयात महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निशुल्क सेवा, विविध योजनांमध्ये मिळणाऱ्या सवलतीबाबत दर्शनी भागात फलक लावून रुग्णांना माहिती द्यावी असे निर्देश दिले होते. तसेच आत्तापर्यंत किती प्रसूती, शस्त्रक्रिया गर्भपात झाले? किती रुग्णांना योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले? याची माहिती सादर करण्यास सांगितले होते, त्यानुसार आज आयोगास अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णालयातील महिला तक्रार समितीने अर्जदारांशी समन्वय साधत सुरक्षिततेचे भावना निर्माण करून न्याय मिळवून द्यावा असेही सांगितले. त्यानुसार या सर्व बाबींवर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.