पंढरपूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच पालखी मार्गावर भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याची सूचना केली. जे कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही दिला.जिल्हा परिषदेत संताच्या पालखी मार्गावरील संपर्क अधिकारी, नोडल अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची संयुक्त व्हीसी घेऊन कामाचा आढावा घेतला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंती नरेंद्र खराडे यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते. जंगम यांनी यावेळी पालखी मार्गाचे १७२ किमी अंतरातील सर्व ग्रामसेवकांना सूचना दिल्या. प्रमुख संताच्या पालखी मार्गाचे स्वागत व नियोजनासाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख संपर्क अधिकारी म्हणुन नेमले आहेत. तसेच मुक्कामाच्या पालखीच्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. संपर्क अधिकाऱ्यांनी दररोज चार तासाला कामाचा आढावा घ्या. वृध्द भाविक, महिला भाविक, लहान मुले, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅडची व्यवस्था, पालखी तळावर शौचालयाची ठिकाणे पाण्याची व्यवस्था, स्रानगृहाची व्यवस्था आदींची पूर्तता करा. स्वच्छता, पिण्याच्यापाण्याचे नमुने तपासून घ्या. प्रत्येक मार्गावर योग्य ठिकाणी दिशा दर्शक फलक असतील याची दक्षता घ्या, असे सांगितले.हालगर्जी पणा करणाऱ्या वर कारवाई करणार- सिईओ कुलदीप जंगम वारकरी यांची सेवा म्हणून काम करा. पालखी मार्गावर ज्यांनी नव्याने नियुक्ती आ हे त्यांनी पुर्ण काम समजून घ्या. कुणी जर हालगर्जीपणा केला तर कारवाई करणे साठी आपण मागे पुढे पाहणार नाही अशा स्पष्ट सुचना दिल्या. कामात त्रुटी आढळल्यास पंचायत च्या विस्तार अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. अशा स्पष्ट सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिल्या.चालू वर्षांचा निधी यात्रेपूर्वी दिला आहे. मी स्वत पालखी मार्गावरील सर्व ठिकाणी येऊन भेटी दिल्या आहेत, जागेवर प्रत्येक बाबीच्या सूचना दिले आहेत. योग्य नियोजन करून दिले आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करा. कुचराई करू नका.पावसाळ्याच्या तोंडावर पालखी मार्गावरील नदी काठच्या गावावर पुरस्थिती निर्माण होऊ शकते. परिणामी भाविकांचा रहदारीचा मार्ग, उभे व आडवे रिंगण सोहळा जाणेचा मार्गावर चिखल होणार नाही याची दक्षता घ्या.व्हाटसअॅपवर व नेल द्वीरे लेखी सुचना पाठवा त्याची तात्काळ अंमलबजावणी करणेत येईल, असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी ठामपणे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी प्रत्येक पालखी मार्गावरील ग्रामसेवक यांचेकडून देणेत आलेल्या सुविधांचा आढावा घेऊन उर्वरीत कामे वेळेत पुर्ण करणेचे सुचना दिल्या.उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी भाविकांसाठीच्या शौचालयाचे सनियंत्रण करणे साठी जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी देणेत आलेले आहेत. शौचालयाचे समोर चिखल होणार नाही याची दक्षता घ्या. पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या अशा सुचना दिले.
