आटपाडी – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बारावीच्या खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या जन्मदात्या बापाने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल दरम्यान, सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यपक असलेल्या धोंडीराम भोसलेने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२० जून) घडली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना धोंडीराम भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती. तिचे वडील हे नेलकरंजी गावामध्येच एका खासगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहेत. त्यांनी मुलीला खासगी शिकवणी लावली. या खासगी शिकवणीत घेतलेल्या बारावीच्या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले होते. त्यानंतर रागाच्या भरात त्याने मुलीला मारहाण केली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला होता.
