सोलापूर- समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रविवारी सोलापूरमध्ये वारीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, सोलापुरात सोमवारी 23 जून रोजी वारकरी संघटनातर्फे वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारने आझमीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.मुस्लिम समाज रस्त्यावर नमाज पडल्यास कारवाई केली जाते. मात्र आषाढी वारीच्या वेळेस निघणाऱ्या दिंड्यांमुळे खूप वेळ दूँ-फिक जाम होते. मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. असे वादग्रस्त विधान अबू आजमी यांनी केले होते. त्याचे प्रसाद सोलापुरात सोमवारी पडले. वारकरी वारकरी शपथ्यातील प्रमुख महाराज सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकरी संघटनांनी आंदोलन केले. यावेळी टाळ वाजवून अबू आजमींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी संप्रदाय हा शांततेच्या मार्गाने वारी काढतो. ही भारतातील शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजमीनी वारी काय हे आधी समजून घ्यावे. भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा ज्यांना इस्लाम मान्य आहे त्यांनी पाकिस्तानात जावे.भारतात रहावयाचे असल्यास भारताच्च्या परंपरा पाळून बांचा मान राखून राहावे असे ठरल्याचे सांगितले, अबू आझमींनी याची माहिती घ्यावी असा सल्ला दिला. तसेच आझमिचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राज्य सरकारने त्यावर कडक कारवाई करावी, तसे न केल्यास वारकरी संप्रदाय राज्यभरात मोठे आंदोलन करेल असा इशारा दिला.यावेळी बळीराम जांभळे महाराज (राष्ट्रीय सचिव), जोतिराम चांगभले (प्रदेशाध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), बंडोपंत कुलकर्णी, (जिल्हाध्यक्ष), संजय पवार (शहराध्यक्ष), अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
