महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. भाजपसह इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आता अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
दरम्यान, वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र, मुसलमानांनी रस्त्यावर नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात. त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांतून टीकेची झोड उडाली होती.त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडूनमोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे आझमी यांनी म्हटले आहे आझमी पुढे म्हणाले की, मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांबद्दल आदर व्यक्त करतो
