पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून उजनी धरणातून आताच पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता उजनीतून ५० हजार क्युसेक आणि विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर वीर धरणामधून नीरा नदीत ३० हजार ५१३ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. भीमा-नीरा संगमातून चंद्रभागेत जवळपास ८१ हजार क्युसेकचा विसर्ग
दौंडचा विसर्ग घटला
उजनी धरणाची १२३ टीएमसी क्षमता आहे. सध्या १०२ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात आहे. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून ५१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. सायंकाळी ६ वाजता उजनीची पाणी पातळी ७२.२९ टक्के होती. दौंडमधून विसर्ग घटला आहे. राहणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पंढरपूरच्या वाळवंटात पूरस्थिती राहण्याची शक्यता आहे
