पंढरपूर – वारीसाठी अनेक पालख्या पंढरपुरात येत असतात. यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूरकडे जात असते. यात लाखो वारकरी सहभागी होतात. यासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक मार्गात २९ जून ते १० जुलै दरम्यान बदल करण्यात आला आहे.यात पंढरपूरकडून पुणे येथे जाणारे वाहन हे वाखरी – साळमुख फाटा – पिलीव – म्हसवड- फलटण व पंढरपर टेंभर्णी पुणे असा मार्ग असणार आहे.शिवाय वेळापूर येथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांना साळमूख चौक- सातारा रोड, सांगोला येथून पुण्याला जाणारी वाहने पुणे टेंभुर्णी मार्गे, अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणारी वाहने टेंभुर्णी मार्गे वळविण्यात आले आहेत. शिवाय पंढरपूर शहर बाह्य मार्गावरून जडवाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. ३० जून ते ८ जुलैपर्यंत बंद करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक गाड्यांना सट देण्यात आली आहे.
टप्प्याने बंद होणार महामार्ग
गजानन महाराज यांची पालखी ही सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-मंगळवेढा मार्गे जात असते. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी श्री. संत गजानन महाराज यांची पालखी व पायी जाणारे वारकरी ज्या मार्गावरून जसजसे पुढे जातील फक्त त्याच मार्गावर वाहतूक टप्प्या-टप्प्याने बंद करून त्या भागापुरती वाहतूक रस्त्यावरील दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेमधून वळवण्यात येणार आहे, असे आदेश ग्रामीण पोलिसांकडून काढण्यात भाले भने
