पंढरपूर – पंढरपूर ते लंडन वारी १४ एप्रिल रोजी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका घेऊन लंडनकडे मार्गस्थ झाली होती. तब्बल ७० दिवस प्रवास केल्यानंतर ही यात्रा लंडन येथे पोहोचली. लंडन येथे ‘जय हरी विठ्ठल’च्या नामघोषाने विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करून उत्साहात स्वागत करण्यात आले. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून विठ्ठलाच्या पादुकांचे विधिवत पूजन करून या पादुका लंडनकडे मार्गस्थ करण्यात आल्या होत्या. २२ देश, १८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ७० दिवसांनंतर विठ्ठलाच्या पादुका लंडन येथे पोहोचल्या आहेत. मूळचे भारतीय असलेले अनिल खेडकर लंडन येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी लंडन येथे विठ्ठलाचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका नेण्यात आल्या आहेत. या पादुकांचे लंडनमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यामुळे विठ्ठलाच्या पादुका सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत.
