माळेगाव (बारामती) – माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला; तर गुरु-शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले. या गटाला एकही जागा मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘ब’ वर्गातून स्वतःची उमेदवारी जाहीर करून स्वतःचेच नाव चेअरमन पदासाठी घोषित केले. त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले.
