पंढरपूर – मागील काही वारींमध्ये भाविकांच्या गर्दीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे गर्दी वाढून अनाहूत घटना घड्डू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यास तेथील गर्दी इतर ठिकाणी वळवण्यास व योग्य नियोजन करण्यास यंदा ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. यासाठी यंदा एकूण १० ड्रोन असणार आहेत.या गर्दीवरदेखील ड्रोन कॅमेरा व आर्टीफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्या भागात गर्दी जमा झालेली आहे. अशा भागाचे अलर्ट तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षात मिळणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त कुमक पाठवून वेळीच नियंत्रण मिळवता येणार आहे. यासाठी पंढरपुरात सुसज्ज असे वॉर रूम तयार करण्यात येत आहे. यात सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण असणार आहे. जर एखादी मदत कोणाला भासल्यास तेथूनच सर्व सूचना दिल्या जाणार आहेत.
