सोलापूर – अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने देशभरातील विमानतळांना सतर्कतेचा इशारा दिला असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळावर एखादी दुर्घटना घडल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने शुक्रवारी सकाळी विमानतळावर महत्त्वाची बैठक घेतली. पघातापासून वाचण्यासाठी, तसेच आवश्यक उपाययोजनांचा सराव करण्यासाठी सोमवारी, ३० जून रोजी या संदर्भात विमानतळावर मॉकड्रिल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक झाली. या बैठकीत अग्निशमन विभागातील अधिकारी, जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी, पोलिस, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी उपस्थित होते. विमानतळ प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार, तयारी करण्यास सांगितले. विमानतळावर उतरणाऱ्या, तसेच टेकऑफ घेणाऱ्या विमानांची सुरक्षा वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली एखादी आपत्कालीन घटना घडल्यानंतर प्रत्येक विभागाची काय जबाबदारी असायला हवी, यावरही चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या बैठकीला महसूल विभाग, तसेच मनपाचे अधिकारी उपस्थित नव्हते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मॉकड्रिल संदर्भात तयारी करण्याची सूचना करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. शुक्रवारच्या बैठकीला मनपा अधिकारी गैरहजर होते.
