मंगळवेढा – खरीप हंगामासाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.आमदार समाधान आवताडे पुढे म्हणाले की, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात संपूर्ण देशात कडधान्य मिशन राबविण्याची घोषणा केली आहे. हे मिशन पुढिल सहा वर्षासाठी असेल. केंद्रिय कृषि मुल्य आयोग मार्फत खरीप सन २०२५-२६ साठीचे हमीभाव जाहीर केले आहे. सर्व कडधान्याच्या हमीभावांमध्ये ५ टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. तूर पिकाचा हमिभाव मागील ७ हजार ५५० रुपये प्रती किंटल वरून ८ हजार रुपये प्रती विंटल केला आहे.उडदाचा हमीभाव मागील ७हजार ४०० रुपये प्रती क्विंटल वरून ७ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल केला आहे.शेतक-यांकडन कडधान्याची नाफेड व एनसीसीएफ खरेदी करणार आहे. या दोन एजन्सीकडे नोंदणी केलेल्या शेतक-यांची संपुर्ण तूर व उडीद खरेदीची शाश्वती दिली आहे. कृषि विभाग मार्फत तूरीच्या वाढीच्या आवस्थे दरम्यान विविध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात किड व रोगाच्या व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही आवताडे यांनी सांगितले.तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी तुरीचे (वाण – भिमा) बियाणे उपलब्ध झाले आहे. बागायत व जिरायत दोन्ही पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागवडीसाठी योग्य आहे. दोन ओळीतील अंतर ६ फुट व दोन रोपातील अंतर २ फुट ठेवावे. दोन ओळीतील अंतर ५ फुट व दोन रोपातील अंतर २ फुट लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते तसेच एकरी ७००-९०० ग्रॅम बियाणे पुरेसे आहे.
कृषि विभागामार्फत दिले जाणारे बियाणे ४ किलो पॅकिंग मधील आहे. एका बॅग मध्ये ५ एकर तूरीची पेरणी होवू शकते. तुरीचे भिमा वाण १० जुलै पर्यंत लागवडीसाठी फायदेशीर आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळू शकते. तूर पेरणी वेळी प्रती किलो बियाण्यास १० ग्राम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रीया केल्यास मररोगाचे प्रमाण अटोक्यात राहते त्याच बरोबर जैविक जिवाणूसंघाची प्रती किलो बियाण्यास १० मिली बिजप्रक्रीया केल्यास उत्पन्न १० ते २० टक्के वाढू शकते.
पेरणीवेळी खतांची मात्रा वापरल्यास फायदा
पेरणी करताना एकरी ५० किलो डिएपी खताची मात्रा द्यावी. बियाणे उगवून आल्यानंतर पहिल्या २० ते ३० दिवसाच्या आत रोपांची विरळणी करुन रोपातील अंतर ६।२ किंवा ५२ राहिल याची दक्षता घ्यावी. विरळणी झाल्या नंतर ५ टक्के निंबोळी अर्क व २ टक्के युरियाची फवारणी करावी. पहिली छाटणी ४०-४५ दिवसात व दुसरी छाटणी ६० ते ६५ दिवसात करुन घ्यावी.
