सोलापूर – शेगावचे संत गजाजन महाराजांच्या ही पालखीचे रविवारी 29 जून रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात सोलापूरत आगमन झाले सोलापूरकरांनी क्तीभावाने त्याचे स्वागत केले.रूपाभवानी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी स्वागत केले. प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अजित बिन्हाडे, उपायुक्त दीपाली काळे, महापालिका सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी नागनाथ विराजदार, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नर “द्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबुराव जमादार उपस्थित होते.
दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरातून पंढरपुरात जाण्याची ही सलग 56 वर्षांची परंपरा आहे. अतिशय शिस्तबद्ध रचनेत वारकरी पालखीसह दाखल झाले. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जागोजागी सोलापूरकरांनी थंड पाणी व सरबत आदींची व्यवस्था केली होती. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व सोलापूरकर सर्व प्रकारचे भेद विसरून एकत्र आल्याचे दिसून येत होते. जागोजागी सोलापूरकरांनी अतिशय स दर रांगोळी काढल्याचे दिसून आले. पालखी सम्म्राट चौकातील प्रभाकर स्वामी महाराजांच्या मठात आल्यानंतर तेथे दोन्ही संतांच्या पालखींची भेट झाली. मठात पालखीचे गुलाब पुष्प उधळून स्वागत करण्यात आले. हा अनुपम्य सोहळा सोलापूरकरांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. पालखीचा मुक्काम उपलप मंगल कार्यालय येथे असणार असून दोन दिवस सोलापूर शहरात पालखी असणार आहे. त्यानंतर पालखी पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे.गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरांमध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याची अनुभूती आली. चैतन्यमय प्रसंगी पांडुरंगचरणी सोलापूरवासीयांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो, असे आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून 29 व 30 जून रोजी पालखीतील वारक-यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे सांगितले, पालखी मुक्काम हा कुचन प्रशाला व उपलप मंगल कार्यालय आहे. तेथेही आरोग्याच्या, स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली.पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
