पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत मोठ्या संख्येने वारकरी आले आहेत. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी श्रींच्या पदस्पर्श दर्शन रांगेत व मुखदर्शन रांगेत बॅरीकेटींग करण्यात आलेले आहेत. तथापि, श्रींच्या मुखदर्शन ररांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेप्रमाणे सरकता उड्डाणपुल उभारल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची मुखदर्शनरांग श्री संत तुकाराम भवनच्या पाठीमागून छत्रपती छत्रपती संभाजी चौक वारकऱ्यांसाठी सोय संभाजी चौक पर्यंत असते. तथापि, छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपुल नसल्याने दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच स्थानिक रहिवाशी व दुकानदारांच्या देखील तक्रारी प्राप्त होत होत्या.सदरचा उड्डाणपुल 30 फुट लांबी व 10 फुट उंचीचा असून, यामचील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने, एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणा-या रथांना कोणताही अडथळा होणार नाही, 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीतकमी वेळेत पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे. सदर उझणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य व सक्षम असल्याबाबत यांत्रिकी कार्यशाळेचे प्रमाणपत्र देखील घेण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे श्रींची दर्शनरांग द्रुतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ मुखदर्शन होणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
