माऊलींच्या पालखी सोहळ्यात एआय दिंडी पाहायला मिळाली. एआय दिंडीत विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायांतील लोकांना सामावून घेण्यात आले आहे. तसेच ‘एआय’च्या माध्यमातून वारीवर नजर असणार आहे. आयटी दिंडी आणि एआय दिंडी मिळून एकत्रित सुमारे तीन हजार लोक सहभागी असून, यंदाच्या दिंडीत महाराष्ट्रासह दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई यासह विविध देशातून आलेल्या श्री विठ्ठल भक्तांचाही सहभाग आहे.
