सोलापूर- वेळापूर येथील पालखी तळाची पाहणी केली. जर्मन हॅगर मंडपासह, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, हिरकणी कक्ष यांची पाहणी केली. पालकमंत्री गोरे यांचे समवेत माजी आमदार राम सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सुविधांची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी पालखी येण्यापूर्वी एक दिवस अगोदर सर्व सुविधा सज्ज ठेवा, अशा सुचना केल्या. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बालदिंडीत सहभाग घेऊन मुलांना शुभेच्छा दिल्या. सि ईओ जंगम यांचे सहभागाने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला. या प्रसंगी गट विकास अधिकारी सुशील संसा-रे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेणूनगर गुरसाळे येथील बाल दिंडीत सहभाग नोंदविला. त्यानंतर जंगम यांनी पालखी चौक मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, पालखी चौक शौचालय पाहणी, पुनर्वसन गावठाण शौचालय १, पुनर्वसन गावठाण शौचालय २, पुनर्वसन गावठाण स्नानगृह पुणे रोड स्नानगृहची पाहणी केली. या प्रसंगी गटविकास अधिकारी सुशील संसा-रे ग्रामपंचायत अधिकारी सावता शिंदे, उपसरपंच बाळासाहेब लेंगरे ग्रामपंचायत उपस्थित
