पंढरपूर – दि. ६ जुलै रोजी संपन्न होत आ-हे. त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पध्दतीची दर्शनरांग तयार केली असल्याने दर्शनरांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद व सुलभ दर्शन होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.संपूर्ण दर्शनरांगेत सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहितीचे फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टिव्ही, हरवले सापडले केंद्र, फॅब्रिकेटड शौचालये व साफसफाईसाठी जेटींग सक्षण मशिन, उपजिल्हा रूग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत आयसीयू, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छता व्यवस्थेकामी पुरेसा कर्मचारी, अन्नदानेश्वर महाराज व जळगांव सेवा समिती मार्फत 24 तास अन्नदान, मंदिर समितीमार्फत मिनरल वॉटर, चहा, तांदळाची व शाबुदाणा खिचडी, सार्वजनिक सुचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची सुविधा, आपत्कालिन व्यवस्थेसाठी आपत्कालिन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक पध्दतीची विद्युत व्यवस्था, फॅन-कुलर व्यवस्था, मार्गावरील अडथळा दुर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुले उभारण्यात आली आहेत.
यंदा कायमस्वरूपी ४ पत्राशेडच्या शेजारी १०० ७४५० फुटाचे अत्याधुनिक एक सलग तात्पुरते पत्राश-`ड उभारण्यात आले आहे. यामध्ये १००७४५०७१६ फुटात एकच शेड तयार झाले असून एकूण पूर्वीचे ८ पत्राशेड कव्हर झाले आहेत. त्याची उंची १६ फुट व सलग शेड असल्याने आतमध्ये हवा खेळती राहत असून, दर्शनरांग देखील जलद व द्रुतगतीने चालत आहे. संपूर्ण बॅरीकेटींग व पत्राशेडचे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांचेकडून प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.याशिवाय, २४ तास दर्शनाची वेळ, भाविकांच्या हस्ते होणा-या पुजा बंद ठेवणे, घुसखोरी रोखणे, व्हिआयपी व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध, मॅन काऊटींग मशिन, अनुभवी कमांडोज नियुक्ती व इतर अनुषंगीक उपाययोजना करण्यात आल्याने व दर्शनरांगेचे सुक्ष्म नियोजन करून दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालून भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास सुखकर होऊन कमीत कमी वेळेत भाविकांना श्रींचे दर्शन घडत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.
