कुईवाडी – श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे टाळ-मृदंगाचा गजरात हरिनामाचा जयघोष करत फटाक्यांच्या आतषबाजीत, जेसीबीतून फुलांचा वर्षाव करीत कुई ग्रामपंचायतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर असा २५० किमी पायी पालखी दिंडी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, धाराशिव असा चार जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत, सोमवारी मुंगशी ता. माढा या गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यानंतर, बिटरगांव येथे पालखी मुक्कामानंतर मंगळवारी कव्हे दंड येथे सोलापूर जिल्ह्यातील या पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले. त्यानंतर, सायंकाळी कुई ता. माढा येथे सायं ६:३० वा. सुमारास पालखीचे आगमन झाले. सरपंच कुंताबाई चोपडे, वस्ताद अण्णासाहेब ढाणे, अंबादास चोपडे, ग्रामसेवक मोहन पवार, ग्रामपंचायत सदस्य बाबाराजे जगताप, संतोष कापरे, भैय्या माळी, सुधीर लोंढे, माणिक माने, बाबा गायकवाड, शरद कार्यकर्ते, समीर कार्यकर्ते उपस्थित होते.
