जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा भिगवणमध्ये दावा
तब्बल ११७ टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतून येणारे २० टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवू लागले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ज्ञ डॉक्टर
राजेंद्र सिंह राणा यांनी केला आहे. उजनी धरण परिसरात पाहणी केल्यानंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणात
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास २० टीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने यामुळे वरणातील
धरणात विषारी रसायन
राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात फिरून पाहणी केल्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी ११० टक्के भरलेले उजनी धरण आता मोकळे होऊ लागले आहे. या ठिकाणी जमिनीवर जे पांढऱ्या रंगाचे आवरण दिसत आहे, ते सर्व उद्योगातून येणाऱ्या विषारी रसायनाचे असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. अशावेळी विकासाच्या गोष्टी करताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड याला एक न्याय व उजनी धरणाखाली असलेल्या शहरांना दुसरा न्याय असे करणे योग्य आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.
सर्व ११७ टीएमसी पाणी विषारी बनत आहे. या विषारी पाण्यामुळे घरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा
फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे
गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले आहे.
हा कोणता न्याय ?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना तीन पैशाला एक हजार लिटर पिण्यायोग्य पाणी मिळते. हे पाणी खराब करून उजनी धरणात येत असल्याने उजनी धरणाच्या खालच्या नागरिकांना मात्र २० रुपयांना वीस लिटर पाणी विकत घ्यावे लागते.